Pune : पुणे विद्यापीठाचा १ जानेवारीचा पेपर पुढे ढकलण्याची पालक, विद्यार्थ्यांची मागणी

वाघोलीतील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी वर्गाची परीक्षा दोन सत्रात ठेवण्यात आली आहे.

146
Pune : पुणे विद्यापीठाचा १ जानेवारीचा पेपर पुढे ढकलण्याची पालक, विद्यार्थ्यांची मागणी
Pune : पुणे विद्यापीठाचा १ जानेवारीचा पेपर पुढे ढकलण्याची पालक, विद्यार्थ्यांची मागणी

वाघोलीतील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची (Savitribai Phule Pune University) पदवी वर्गाची परीक्षा दोन सत्रात ठेवण्यात आली आहे. ही परीक्षा १ जानेवारीला आहे, मात्र याच दिवशी पेरणेफाटा येथील विजयस्तंभ सोहळ्यास देशरातून लाखो अनुयायी येतात. यामुळे नगर-पुणे महामार्गावरील (Nagar-Pune Highway) रस्ते वाहतुकीसाठी बंद असतात. त्यामुळे १ जानेवारीला घेतली जाणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. (Pune)

३१ जानेवारीला मध्यरात्रीपासून पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक वळवण्यात येते, तर १ जानेवारी रोजी सकाळी १० नंतर वाघोली ते कोरेगाव भीमापर्यंत रस्त्यांवर गर्दी झाल्यामुळे रस्ते बंद होतात. अनेक विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेतात. १ जानेवारी रोजी पदवीच्या द्वितीय आणि तृतीय वर्गाचे २ सत्रात पेपर आहेत. या परीक्षेला गर्दीमुळे रस्ते बंद असल्याने विद्यार्थी परीक्षेला मुकू शकतात. त्यामुळे परीक्षा रद्द करून पुढे ढकलावी, अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. ही विनंती करणारे पत्र महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला दिले आहे. (Pune)

(हेही वाचा – Abu Azmi : आतंकवादी कारवायांतील आरोपींविषयी अबू आझमींना पुळका)

त्या दिवसाची परीक्षा मागे-पुढे करता येणार नाही. त्यामुळे त्या महाविद्यालयांनी दुसऱ्या महाविद्यालयात परीक्षा ठेवाव्यात, नाहीतर ज्या विद्यार्थ्यांना १ जानेवारीच्या गर्दी किंवा रस्तेबंदीमुळे परीक्षेला उपस्थित राहता येणार नाही, त्यांची विशेष परीक्षा घेता येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) परीक्षा विभागाचे, प्रशासकीय अधिकारी गोकुळदास लोखंडे यांनी सांगितले. (Pune)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.