छोटा राजनची भाचीही मागायची खंडणी! पोलिसांनी केली अटक!  

आमचा डीएनए तोच आहे. जर तुम्हाला तुमचा जीव हवा असेल तर ५० लाख रुपये द्या, अशा शब्दांत प्रियदर्शनीने खंडणी मागितली होती. 

कुख्यात गुंड छोटा राजन हाच केवळ गुंडगिरी करायचा नाही तर अवघा परिवार गुंडगिरी करायचा का, अशी शंका यावी अशी घटना उघडकीस आली आहे. छोटा राजनची भाची प्रियदर्शनी हिला पोलिसांनी ५० लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या गुन्ह्याखाली अखेर मंगळवारी, १८ मे रोजी पोलिसांनी तिला जाळ्यात अडकवून अटक केली.

आमचा डीएनए एकच आहे!

छोटा राजन याची भाची प्रियदर्शनी निकाळजे हिने मार्च २०२० मध्ये एका व्यक्तीकडून ५० लाख रुपये खंडणी मागितली होती. मी एका राजकीय पक्षाची जिल्हाध्यक्ष आहे आणि गुंड छोटा राजनची भाची आहे. आमचा डीएनए तोच आहे. जर तुम्हाला तुमचा जीव हवा असेल तर ५० लाख रुपये द्या, अशा शब्दांत प्रियदर्शनीने खंडणी मागितली होती.

(हेही वाचा : राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांची नवी तारीख जाहीर…)

प्रियदर्शनी फरार होती!

प्रियदर्शनी निकाळजे ही मागील वर्षांपासून फरार होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रियदर्शनासाठी जाळेच पसरले. त्यात २५ लाख रुपयांची खंडणी मागताना धीरज साबळे याला पोलिसांनी रंगेहात पकडला. त्याच्या चौकशीतून मंदार वाईकर याला अटक करण्यात आली. मात्र प्रियदर्शनी फरार झाली होती. या दरम्यान पोलिसांनी खबर मिळाली कि, प्रियदर्शनी निकाळजे वानवाडी या भागात येणार येणार आहे. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून प्रियदर्शनीला अटक केली. तिला ७ दिवसांसाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here