पुण्यातील दुचाकीस्वारांना पोलिसांचा इशारा, ‘हे’ करत असाल तर होणार कारवाई

110

दुचाकीस्वार आपल्या वाहनांना आवाज करणारे सायलेन्सर लावून अनेकदा इतरांच्या कानांना विनाकारण इजा पोहोचवत असतात. पुणे शहरातील अशा बेशिस्त दुचाकीस्वारांवर आता कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. अशा पद्धतीने मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून इतरांचे लक्ष विचलित करणा-यांवर दंडात्मक कारवाई करुन, सायलेन्सर जप्त करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.

ध्वनी प्रदुषणात वाढ

पुणे शहरासह उपनगरांमध्ये देखील काही दुचाकीस्वार आपल्या वाहनांचे सायलेन्सर मॉडिफाय करत आहेत. या सायलेन्सरमधून मोठमोठ्याने फटाक्यांचा आवाज काढण्यात येत असून, त्याचा त्रास रस्त्यावरील इतर वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांना होत आहे. तसेच शाळा-महाविद्यालये,रुग्णालये आणि नो हॉर्न झोनमध्येही ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

(हेही वाचाः आता रेल्वेमध्येही मिळणार मराठमोळी पुरणपोळी, ‘असा’ आहे IRCTC चा नवा मेन्यू)

कारवाईचे आदेश

त्यामुळे नागरिकांना होणारा मानसिक त्रास टाळण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तांनी अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे सायलेन्सर बसवणा-या गॅरेजेसची यादी देखील तयार करण्यात आली असून, त्यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याचे सांगितले जात आहे.

या ठिकाणांवरील दुचाकी रडारवर

पुणे शहरातील गजबजलेली ठिकाणे विशेशतः फर्ग्युसन रस्ता,जंगली महाराज रस्ता,कॅम्प परिसर,बाजीराव रोड,डेक्कन परिसर,शिवाजीनगर,स्वारगेट,सेनापती बापट मार्ग,विद्यापीठ चौक,सदाशिव पेठ,नारायण पेठ यांच्यासह इतरही काही महत्वाच्या चौकांमध्ये बेशिस्त दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.

(हेही वाचाः विनोद कांबळी निवडणार टीम इंडिया? निवड समितीच्या अध्यक्षपदी कोण येणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.