Pune Porsche Accident : अखेर ‘त्या’ बाळाने लिहिला 300 शब्दांचा निबंध

Pune Porsche Accident : गंभीर प्रकरणात २ तरुणांचा जीव घेणाऱ्या मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगितल्याच्या निर्णयावर जोरदार टीकाही झाली होती. अखेर दोन महिन्यानंतर लाडोबाने निबंध सादर केला आहे.

115
Pune Porsche Accident : अखेर 'त्या' बाळाने लिहिला 300 शब्दांचा निबंध
Pune Porsche Accident : अखेर 'त्या' बाळाने लिहिला 300 शब्दांचा निबंध

अल्पवयीन मुलाने 300 शब्दांचा निंबध बालहक्क मंडळाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला आहे. मुलाचे आई-वडील अजूनही इतर गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. (Pune Porsche Accident)

पुणे शहरातील (Pune Porsche Accident) कल्याणीनगर (Kalyaninagar) अपघातानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. पोर्शे कारच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अल्पवयीन असूनही बेदरकारपणे कार चालवणाऱ्या बिल्डरपुत्राची अवघ्या 15 तासांत सुटका झाली. या गंभीर प्रकरणात २ तरुणांचा जीव घेणाऱ्या मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगितल्याच्या निर्णयावर जोरदार टीकाही झाली होती. अखेर दोन महिन्यानंतर लाडोबाने निबंध सादर केला आहे.

(हेही वाचा – Britain Election Result 2024 : ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव; लेबर पार्टी मतमोजणीत आघाडीवर)

अल्पवयीन आरोपीची काही दिवसापूर्वी बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली. सुटका करताना त्या वेळी त्याला काही अटी शर्थी घालून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये त्याने 300 शब्दांचा निबंध लिहून देण्याची अट होती. या निबंधामध्ये अपघात घडल्यनंतर काय करायले हवे किंवा अपघात घडू नये; म्हणून स्वत: काय काळजी घ्यावी या पद्धतीचा निबंध लिहणे आवश्यक होते. बालनिरीक्षणगृहातून बाहेर पडल्यानंतर अखेर अल्पवयीने मुलाने 300 शब्दांचा निंबध बालहक्क मंडळकडे वकिलांच्यामार्फत सादर केला आहे.

यापूर्वी दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतल्यानंतर अवघ्या 15 तासांमध्येच त्या अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता. त्यामुळे नागरिकांतून एक प्रकारची नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा नवीन कलम लावलं आणि त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला. (Pune Porsche Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.