Pune Porsche Accident : अग्रवालांच्या ‘बाळा’ची आई अडचणीत

पोलिसांनी आरोपींना येरवडा पोलीस ठाण्यात नेले. सकाळी त्यांना ससूनमध्ये रक्त चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्यावेळी अल्पवयीन मुलासोबत त्याची आई शिवानी अगरवाल होती.

316

पुण्याच्या कल्याणीनगर पोर्शे कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणात दररोज नवी माहिती उघड होत आहे. अल्पवयीन आरोपीने मद्यपान करुन कार चालवल्याचा आरोप झाला. त्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात घेतले गेले. पण हे नमुने ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी बदलल्याचा आरोप झाला. बदलेले रक्ताचे नमुने आरोपीच्या आईचे असल्याची माहिती उघडकीस आली. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालची पत्नी शिवानीच्या रक्ताचे नमुने फेरफार करुन आरोपीच्या नावाखाली पाठवण्यात आल्याचा आरोप झाला. त्यानंतर आता आरोपीच्या आईच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत.

१९ मेच्या मध्यरात्री पोर्शे कारने भरधाव वेगात दुचाकीला धडक दिली (Pune Porsche Accident). स्थानिकांनी कारमधील सगळ्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपींना येरवडा पोलीस ठाण्यात नेले. सकाळी त्यांना ससूनमध्ये रक्त चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्यावेळी अल्पवयीन मुलासोबत त्याची आई शिवानी अगरवाल होती. ससूनचे डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केली. हळनोरने आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले.

(हेही वाचा Rafah चे समर्थन करणाऱ्या बॉलिवूडकरांना क्रिकेटर राहुल तेवतियांचे सडेतोड उत्तर; म्हणाले…)

रक्त चाचणीचे नमुने कुणाचे? 

आरोपी मद्यपान करुन कार चालवत असल्याचा आरोप होता. त्यामुळे रक्त चाचणीचा अहवाल महत्त्वाचा होता. आरोपीला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी नमुन्यांमध्ये फेरफार केली. त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचे रक्त आरोपीचे रक्त म्हणून तपासणीस पाठवले. हे रक्त एका महिलेचे असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ती महिला कोण, असा प्रश्न निर्माण झाला. आरोपीला ससूनमध्ये चाचणीसाठी नेले, त्यावेळी त्याच्यासोबत त्याची आई शिवानी होती. त्यामुळे ते रक्त शिवानी यांचे असल्याचा दाट संशय आहे. डॉक्टरांनी आरोपीचे म्हणून तपासणीसाठी पाठवलेले रक्त त्याच्या आईचे होते की अन्य कोणत्या बाईचे होते, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.