Pune Porsche Acident प्रकरणी शिवानी अग्रवाल पोलिसांच्या ताब्यात!

171
Pune Porsche Acident प्रकरणी शिवानी अग्रवाल पोलिसांच्या ताब्यात!
Pune Porsche Acident प्रकरणी शिवानी अग्रवाल पोलिसांच्या ताब्यात!

पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन केसप्रकरणातील (Pune Porsche Acident ) मोठी घडामोड समोर आली आहे. या अपघातास जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन आरोपीची आई आता पोलिसांच्या ताब्यात आहे. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी शिवानी अग्रवाल (Shivani Agarwal) हिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (Pune Porsche Acident )

(हेही वाचा –Mumbai Bomb Threat: ताज हॉटेल, विमानतळ उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक)

क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agarwal) यांना आधीच पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याची आईदेखील पोलिसांच्या ताब्यात असून तिची कसून चौकशी करण्यात येणार आहे. (Pune Porsche Acident )

(हेही वाचा –Lok Sabha Election Phase 7 मतदान सुरू! शेवटच्या टप्प्यात होणार चुरशीच्या लढती)

शिवानी अग्रवाल हिच्यावरही कायदेशीर कारवाई केली आहे. शिवानी अग्रवाल हिची कसून चौकशी केली जाणार आहे. दुपारनंतर अग्रवालला कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवानी अग्रवालच्या चौकशीत नेमक्या कोणत्या नवीन गोष्टी समोर येणार, याकडे लक्ष असेल. (Pune Porsche Acident )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.