पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Pune Porsche Car Accident) आरोपी मुलाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आरोपी मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम वाढला आहे. बुधवारी, (१२ जून) आरोपी मुलाला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बाल न्याय मंडळाने आरोपी मुलाचा निर्णय २५ जूनला घेण्यात येईल, असे सांगत कामकाज स्थगित केले. त्यामुळे आता आरोपी मुलाला २५ जूनपर्यंत बालसुधारगृहातच राहावे लागणार आहे. (Pune Porsche Car Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा मुक्काम २५ जूनपर्यंत बाल सुधारगृहातच असणार आहे. बाल न्याय मंडळाचे नियमित मुख्य न्यायाधीश सुनावणीदरम्यान उपस्थित नव्हते. त्यांच्या जागी दुसऱ्या न्यायाधीशांनी सुनावणी घेतली. त्यामुळे मी नियमित न्यायाधीश नसल्याने अल्पवयीन आरोपीबाबतचा निर्णय २५ जूनला घेण्यात येईल, असं म्हणत न्यायालयाने कामकाज स्थगित केले. त्यामुळे अल्पवयीन आरोपी मुलाला २५ जूनपर्यंत बाल सुधारगृहातच राहावे लागणार आहे. (Pune Porsche Car Accident)
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पी. टी. उषाला भारताकडून किमान १० पदकांची अपेक्षा )
बाल न्याय मंडळात झालेल्या सुनावणीदरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला आणखी १४ दिवस बाल सुधारगृहात ठेवण्याची मागणी केली होती. बचाव पक्षाने मुलाला घरी सोडण्याची विनंती बाल न्याय मंडळाकडे केली. या सुनावणीदरम्यान पोलिसांची तपासणी सुरू आहे. मुलाला घरी सोडल्यास इतर नातेवाईकांच्या मदतीने तपासावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे बाल सुधारगृहात मुलाचे समुपदेशन सुरू आहे. ते पूर्ण व्हायचे आहे. त्यासाठी त्याला बालसुधारगृहातच ठेवावे. मुलाच्या घरी त्याची काळजी घ्यायला कोणी नाही. त्यामुळे त्याच्या मनावर परीणाम होऊ शकतो. अल्पवयीन मुलाच्या जीवाला बाहेर धोका होऊ शकतो. त्यामुळे त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असे सांगितले. (Pune Porsche Car Accident)
रक्त तपासणी अहवालात फेरफार
दरम्यान, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलगा सध्या बालसुधारगृहामध्ये आहे, तर याप्रकरणी आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल, ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोळ, शिपाई अतुल घटकांबळे, मुंबईतून अटक केलेले दोघेजण हे सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत. अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्त तपासणी अहवालात फेरफार केल्या प्रकरणात या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
हेही पहा –