Pune Porsche Car Accident : आता ससूनमध्ये रक्तासह आराेपींच्या लघवीचेही नमुने घेतले जाणार ?

Pune Porsche Car Accident : मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे आणि इतर रुग्णालयाच्या दाेन प्राध्यापक सदस्यांच्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली हाेती. त्यामध्ये काही शिफारशी करण्यात आल्या असून, त्यांपैकी ही एक शिफारस करण्यात आली आहे.

160
Pune Porsche Car Accident : आता ससूनमध्ये रक्तासह आराेपींच्या लघवीचेही नमुने घेतले जाणार ?
Pune Porsche Car Accident : आता ससूनमध्ये रक्तासह आराेपींच्या लघवीचेही नमुने घेतले जाणार ?

नार्काेटिक म्हणजेच अमली पदार्थ सेवनाची शक्यता असलेल्या आराेपींनाही वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात (कॅज्युअल्टी) आणले जाते. त्यावेळी त्यांची केवळ रक्ताची तपासणी केली जाते. आता त्यांच्या लघवीचेही नमुने घ्यावेत, अशी शिफारस रक्ततपासणी प्रकरणात हेराफेरीची चाैकशी केलेल्या समितीने केली आहे.

(हेही वाचा – ‘उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती;  काय म्हणाले Deepak Kesarkar?     )

समितीने केली शिफारस

ससून रुग्णालयात दाेन डाॅक्टरांनी अल्पवयीन आराेपीचा रक्ताचा नमुना बदलल्याचे प्रकरण नुकतेच घडले आहे. त्या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे आणि इतर रुग्णालयाच्या दाेन प्राध्यापक सदस्यांच्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली हाेती. या समितीने या प्रकरणाची चाैकशी करून वैद्यकीय शिक्षण विभागाला अहवाल सादर केला. त्यामध्ये काही शिफारशी करण्यात आल्या असून, त्यांपैकी ही एक शिफारस करण्यात आली आहे.

दरम्यान, या कार अपघातात अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल आणि त्याची पत्नी शिवानी यांना रविवारी विशेष न्यायालयाने पाच जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल सुरेंद्र अगरवाल आणि आई शिवानी (दोघेही रा. बंगलो क्र. १, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांना गुन्हे शाखेने अटक केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.