Pune Porsche Car Accident: “राजकीय दबावाला बळी पडू नका…”, पुणे अपघात प्रकरणी CM Ekanth Shinde यांचे पोलिसांना निर्देश

पुण्यात धनिकपुत्राच्या पोर्शे कारने दोघांना चिरडले. नागरिक संतापले. पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई. टीकेची प्रचंड झोड उठल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

307
Pune Porsche Car Accident: “राजकीय दबावाला बळी पडू नका…”, पुणे अपघात प्रकरणी CM Ekanth Shinde यांचे पोलिसांना निर्देश

पुण्यात अल्पवयीन (Pune Porsche Car Accident) मुलाने दारुच्या नशेत आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. त्यांनतर १५ तासातच आरोपीला  जामीन  मिळाला.  आरोपी अल्पवयीन असला तरी त्याला एवढ्या लवकर जामीन कसा मिळाला? पुणे पोलिसांवर कुठल्या राजकीय नेत्याचा दबाव होता का? असे म्हणून विरोधकांनी  टीकेची झोड उडवली होती. याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) आणि पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधत राजकीय दबावाला बळी पडू नका आणि कुणालाही पाठीशी घालू नका, असे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

(हेही वाचा –  Rameshwaram Cafe Blast प्रकरणात मोठी अपडेट! एनआयएची देशभरात ११ ठिकाणी छापेमारी)

पुण्यात वेदांत अग्रवाल या (Vedant Agarwal) अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. वेदांत चालवत असलेली पोर्शे कार तब्बल 200किमीच्या सुसाट वेगाने एका बाईकला धडकली होती. यामध्ये बाईकवर बसलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पोलिसांनी वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) याच्यावर कारवाई करण्यात चालढकल केली होती. त्यामुळे वेदांत अग्रवाल अवघ्या १५ तासांमध्ये जामिनावर बाहेर  आला होता. वेदांत अग्रवाल हा पुण्यातील बडे उद्योजक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा मुलगा आहे. त्यामुळेच पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई झाल्याचा आरोप झाला होता. या सगळ्यामुळे सामान्य जनता संतापली असून, या घटनेसंबंधी रोष व्यक्त करत आहेत. (Pune Porsche Car Accident)

(हेही वाचा – Hunt For New Coach : मुख्य प्रशिक्षक पदासाठी आता बीसीसीआयच्या रडारवर स्टिफन फ्लेमिंग)

मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही, तरीदेखील वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली, तसेच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करीत असल्याचेही वडिलांना माहिती आहे, असे अल्पवयीन आरोपीने पोलिसांना सांगितले. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना निर्देश दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police Commissioner Amitesh Kumar) संवाद साधला.

पोलिसांकडून कारवाईचा धडाका

पुणे पोलिसांनी सुरुवातीच्या काही तासांमध्ये या प्रकरणात अपेक्षित कामगिरी केली नसली तरी मंगळवारी पहाटेपासून पोलिसांनी वेगवान कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून उद्योजक विशाल अग्रवाल याला ताब्यात घेतले. तसेच वेदांत अग्रवाल याने ज्या हॉटेलमध्ये मद्यप्राशन केले होते आणि तो ज्या पबमध्ये गेला होता, तेथील मालक, मॅनेजर आणि बार टेंडरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांना आता न्यायालयात हजर केले जाईल. (Pune Porsche Car Accident)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.