Pune Rain : पुणे शहरात सर्वाधिक पाऊस, १० दिवसांत किती मिलीमीटर पावसाची नोंद? जाणून घ्या…

पावसाचे हे प्रमाण जून महिन्यातील सरासरी पावसाच्या ५०.५ टक्के झाले आहे.

113
Rain Update: मुंबई, पुण्यासह कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस? हवामान खात्याचा अंदाज जाणून घ्या
Rain Update: मुंबई, पुण्यासह कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस? हवामान खात्याचा अंदाज जाणून घ्या

पुणे शहर आणि जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यातील पहिल्या १० दिवसांतच एकूण सरासरी पावसाच्या निम्मा पाऊस पडला. यानुसार, १० जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८८.९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक २०१.६ मिलीमिटर पाऊस पुणे शहरात पडला आहे. (Pune Rain )

जून महिन्याचा शहर व जिल्ह्याचा एकूण सरासरी पाऊस हा १७६.२ मिलिमीटर आहे. यापैकी आतापर्यंत प्रत्यक्षात ८८.९० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाचे हे प्रमाण जून महिन्यातील सरासरी पावसाच्या ५०.५ टक्के झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी १ जूनपासून पडलेल्या पावसाची दैनंदिन नोंद केली जाते. यानुसार तालुका व महिनानिहाय एकूण सरासरी पाऊस, प्रत्यक्षात झालेला पाऊस आणि एकूण सरासरीच्या तुलनेत झालेला पाऊस टक्केवारीत नोंदला जातो.

(हेही वाचा – Toll collection : Fastag लवकरच होणार रद्दबातल; वाहतूक कोंडीशिवाय होणार टोलवसुली ) 

५ जूनपासून पाऊस पडण्यास सुरुवात
दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक १५०.३ मिलिमिटर पाऊस इंदापूर तालुक्यात पडला असून, सर्वात कमी म्हणजे केवळ २७ मिलिमिटर पाऊस जुन्नर तालुक्यात नोंदला गेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यातील पहिल्या आठवड्यातील ४ तारखेपर्यंत कुठेही पाऊस पडला नव्हता. ५ जूनपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून, या महिन्यातील पहिल्या आठवड्यातील अवघ्या पाचच दिवसांत जून महिन्यातील एकूण सरासरी पावसाच्या निम्मा पाऊस नोंदला गेला असल्याचे सोमवारी (ता.१०) जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तालुका पाऊस मि.मी टक्केवारी

पुणे शहर २०१.६ १३१.९

हवेली ११०.५ ६३.००

मुळशी ६५.१ २३.४

भोर १०४.२ ५०.७

मावळ ४२.८ १९.१

वेल्हे ९०.८ १९.५

जुन्नर २७ो २३.४

खेड ४४.९ ३५.३

आंबेगाव ५०.६ ३७.७

शिरूर ७८ ८६.६

बारामती १४७.९ १६९.८

इंदापूर १५०.३ १४७.२

दौंड ११०.५ ११६.९

पुरंदर ७१.९ ६४ टक्के

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.