राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यामध्येही शनिवारी, (८ जून) अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कोकणासह मध्य महाराष्ट्रात मान्सूनच आगमन झाल्यामुळे मुसळधार पाऊस सुरू आहे. (Rain Alert)
कोकण
पुढील तीन-चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सरासरी ५०-६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट, १०० मिमीहून अधिक पाऊस काही ठिकाणी पडण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्गासाठी रविवारी रेड अलर्ट, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावरदेखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (Rain Alert)
विदर्भात ‘यलो अलर्ट’
कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात रविवारी, (९ जून) अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी वाऱ्यांसह सर्वत्र पावसाची शक्यता आहे. तर संपूर्ण विदर्भासाठी रविवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अप्पर ओटा या ठिकाणी झाड पडून एका व्यक्तिचा मृत्यू झाला. सोलापूरातही रात्रभर मुसळधार पाऊस पडल्यामुळे सखल भागात पाणी शिरलं, मात्र कडाक्याच्या उन्हामुळे वैतागलेल्या सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रविवारी जोरदार पाऊस बरसण्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.
कोल्हापूर, सातारा
कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी वाऱ्यांसह सर्वत्र पावसाची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community