Pune Rain Update : सर्वांनी फिल्डवर उतरा; एकनाथ शिंदेंचे पुण्यातील अधिकाऱ्यांना आदेश

220
Pune Rain Update : सर्वांनी फिल्डवर उतरा; एकनाथ शिंदेंचे पुण्यातील अधिकाऱ्यांना आदेश
Pune Rain Update : सर्वांनी फिल्डवर उतरा; एकनाथ शिंदेंचे पुण्यातील अधिकाऱ्यांना आदेश

पुण्यात मुसळधार पावसामुळे (Pune Heavy Rain)अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गाचा जोर आणखी वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनला सतर्कतेचा आदेश दिले आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी देखील बोललो आहे. मी स्वत: या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. लोकांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. (Pune Rain Update)

खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग

खडकवासला (Khadakwasla) धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने मुठा नदीला पूर (Pune Heavy Rain) आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पूलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाळी आहे. सिंहगड परिसरातील निंबजनगर भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नागरिक अडकून पडले आहेत. निंबजनगर परिसरातील काही गाड्यांमध्ये काही नागरिक अडकून पडले होते. गाड्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पाण्याचा प्रवाह वाढल्याने गाड्या अडकून पडल्या. त्या गाड्यामध्ये काही जण अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

स्त्यावर, सोसायट्यांमध्ये ५ फुटांवर पाणी

पाण्याचा प्रवाह वाढल्याने अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. गाडीच्या काचा फोडून त्या नागरिकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. रस्त्यावर, सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. लहान मुले, महिला, नागरिकांनी त्या ठिकाणाहून बोटीतून बाहेर काढण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी या वेळीही नागरिकांनाही आवाहन केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल. पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एनडीआरएफ आणि लष्कराचे कर्नल यांच्याशी मी बोललो आहे. तसेच याआधीच त्यांनी एनडीआरफच्या बोटी वैगरे रवाना केल्या आहेत. लष्कर देखील आता पुण्यात पोहचते आहे. तसेच वेळ पडल्यास बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Pune Rain Update)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.