Rain Update राज्यात मागच्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट वाढली असून, पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे, ढगांच्या गडगडाटांसाह पुण्यातील उपनगरीय भागात पावसाच्या सरी (Pune Rain) कोसळत आहेत. त्यामुळे दिवसभराच्या उकाड्यानंतर संध्याकाळी पाऊस आणि जोरदार हवा यामुळे रात्री वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. खराडी (Kharadi) परिसरात गारांचा पाऊस होत आहे. बोराएवढ्या गारा जमिनीवर कोसळत आहेत. वाघोली (Wagholi) परिसरात देखील गारांचा पाऊस सुरु झाला आहे दरम्यान, पावसाच्या उकाड्यापासून पुणेकरांना काहींसा दिलासा मिळाला आहे. (Rain Update)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मतदान टक्का वाढवण्यासाठी १६ राज्यस्तरीय सदिच्छादूत )
अवकाळी पावसामुळे नुकसान
पुणे शहरात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy weather) आहे. त्यामुळे वातावरणात उकाडा ही जाणवत होता. त्यामुळे पुण्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असून, वाघोली आणि खराडी भागात गारपीटांचा मारा दिसून येतो. उबाळे नगर परिसरात होर्डिंग कोसळले आहे. पावसासोबत जोराचा वारा देखील सुरु आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) देखील झाली आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरची रांगा लागल्या आहेत. विद्युत तारा तुटल्या असल्यामुळे दोन चारचाकीचे नुकसान झाले. तर पुणे नगर महामार्गालगतही (Traffic Jam) काही ठिकाणी पाणी साचले. (Rain Update)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community