पुणेकरांनो सावधान! कचरा जाळताना दिसल्यास ‘Special Squad’चे पथक करणार कारवाई

31

Special Squad : पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कचरा जाळण्याच्या घटना वाढत आहेत. अशाच प्रकरणी पुण्यातील ‘परिसर’ नावाच्या संस्थेने (Parisar Sanstha) एक अहवाल महापालिकेत सादर केला होता. त्यानंतर महापालिकेने आता शहरात कुठेही कचरा जाळत असतील, तर त्यावर कारवाई करण्यासाठी ‘स्पेशल स्क्वॉड’ (Special Squad) तयार केला आहे. नागरिकांनी त्यांना संपर्क केल्यास त्वरीत घटनास्थळी जाऊन ते कारवाई करणार आहेत. (Special Squad)

याविषयी ‘परिसर’संस्थेने सर्वेक्षण करून महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) परिसरात सर्रास कचरा जाळत असल्याचे समोर आणले होते. रस्त्यालगत कचरा साठून ठेवला की, त्याचे काय करायचे? म्हणून तो जाळला जातो. त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्याही असतात. परिणामी कार्बन डॉयऑक्साइड व इतर विषारी वायू वातावरणात जातात. म्हणून कचरा जाळू नये यासाठी परिसर संस्था काम करत आहे. कचरा जाळल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. शहरातील वाढलेली वाहनांची संख्या, बांधकामे यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. त्यात कचरा जाळला जातो. परिणामी त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. (Special Squad)

(हेही वाचा – दिल्लीमध्ये लवकरच Ayushman Bharat Yojana)

महापालिकेने वॉर्डनिहाय स्पेशल स्क्वॉडची नियुक्ती केली आहे. दोन किंवा तीन शिफ्टमध्ये हे लोक काम करतील. याविषयी भोसले नगरमध्ये नुकतेच काहीजण पानांचा ढिग करून तो जाळत होते. तेव्हा एका नागरिकाने महापालिकेला फोन केला. तेव्हा तत्काळी त्याची दखल घेऊन घटनास्थळी हे स्क्वॉड (Special Squad) पोहचले. त्यांनी नागरिकांना समज देखील दिली, अशी माहिती ‘परिसर’च्या शर्मिला देव यांनी दिली.

(हेही वाचा – रणजित सावरकर यांची नाशिक येथील Abhinav Bharat Mandir येथे भेट; नूतनीकरणाच्या कामाची केली पाहणी)

पुणे महापालिकेची तयारी

१) १५ वॉर्डनिहाय स्क्वॉड

२) स्क्वॉडमध्ये दोन ते तीन व्यक्ती

३) तीन शिफ्टमध्ये काम

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.