Dahihandi festival : पुणेकरांना रात्री 10 वाजेपर्यंत दहीहंडी साजरी करता येणार, सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचं पालन

162
Dahihandi festival : पुणेकरांना रात्री 10 वाजेपर्यंत दहीहंडी साजरी करता येणार, सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचं पालन
Dahihandi festival : पुणेकरांना रात्री 10 वाजेपर्यंत दहीहंडी साजरी करता येणार, सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचं पालन

पुणेकरांना आता दहीहंडी उत्सव रात्री 10 वाजेपर्यंत साजरा करता येणार आहे. याआधी शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी उत्सवाला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली होती, पण सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत डॉल्बीच्या वापराला बंदी आहे. त्यामुळे शहरात रात्री 10 वाजेपर्यंतच दहीहंडी उत्सवाला परवानगी देण्यात आली आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहीहंडी उत्सव मंडळांकडून दहीहंडी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे मजूर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजुर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई, महाराष्ट्र साहित्य परिषद, नवी पेठ या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पुण्यात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते.

(हेही वाचा – Parliament Special Session: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेच्या नवीन इमारतीत होणार कामकाजाला सुरुवात )

यंदाच्या दहीहंडी वैशिष्ट्य…
सध्या पुण्यातील चौकाचौकांत दहीहंडीचा जल्लोष दिसून येतो. येथील बाजीराव रोड, मंडई, बाबूगेनू ही मोठी दहीहंडी मंडळे आहेत.लाखो लोक हा उत्सव पाहण्यासाठी घराबाहेर पडतात, मात्र यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तदेखील तैनात करण्यात येतो. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस कायम तत्पर असतात किंवा अपघात झाल्यास लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी संपूर्ण सुविधा देण्यात येते. दरवर्षी लाखो रुपयांची बक्षिसेदेखील देण्यात येतात.यंदाच्या दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे तृतीयपंथीयांना विविध सणा-समारंभात सहभागी करून घेण्यासाठी पुण्यात वेगवेगळ्या उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत.यासाठी पुण्यात दहीहंडीसाठी खास तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक स्थापन करण्यात आलं आहे. हे राज्यातील पहिलंच तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.