पुणेकरांची पसंती इलेक्ट्रिक गाड्यांना; चार महिन्यांत ७१०० गाड्यांची विक्री

इंधनाचे वाढते दर व पर्यावरणाचा दृष्टिकोन ठेवून पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) खरेदी केली आहे. अवघ्या चार महिन्यांत सात हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री पुण्यात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीत सुमारे ७० टक्के वाढ झाली आहे.

( हेही वाचा : बेस्टचे विलीनीकरण हा भाजपचा प्रमुख अजेंडा – नितेश राणे)

चार महिन्यांत ७१०० गाड्यांची विक्री

गेल्या १२ महिन्यांत सुमारे ९९०० इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती, तर आता चार महिन्यांतच ७१०० वाहनांची विक्री झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होत आहे. त्यामुळे वाहनधारकांचा इंधनावर होणारा खर्च खूपच कमी झाला आहे. परिणामी, इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. दहा वर्षांपूर्वी पुण्यात वर्षभरात केवळ ५१ दुचाकींची विक्री झाली होती. ती आता आठ हजारांहून अधिक झाली आहे. यंदा चार महिन्यांच्या आकडेवारीचा विचार केला तर ६३०० दुचाकींची विक्री झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास आणखी काही महिन्यांचा काळ आहे. त्यामुळे दुचाकी विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here