पुणे सोलापुर महामार्गाने लातुरहुन पुण्याकडे जाणाऱ्या आराम बसचा दौंड तालुक्यातील पाटस येथे भीषण अपघात झाला. यामध्ये दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.तर तीस प्रवाशी जखमी झाले. पहाटेच्या वेळी प्रवाशांचा आक्रोश,बसमध्ये रक्ताचे सडे या दृश्याने अनेकांची मने हेलावून गेली. गुरुवारी (२६ ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. (Pune Accident)
ही आराम बस रस्त्याच्या बाजुला उभ्या असणाऱ्या सिमेंट वाहतुकीच्या ट्रकला धडकल्याने हा भीषण अपघात झाला.सत्याभामा बोयने (वय ७२) रा.शहाजा-निलंगणा (लातुर),श्वेता पंचाक्षरी रा.शहाजा-निलंगणा (जि.लातुर) या दोन महिलांचा यात मृत्यू झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गाने लातुरहुन एक आऱाम बस प्रवाशी घेवून पुण्याकडे जात होती. पहाटेच्या सुमारास दौंड तालुक्यातील पाटस घाटात रस्त्यात बंद पडलेल्या सिमेंट वाहतुकीच्या ट्रकला आराम बसची जोराची धडक बसली. अपघात इतका भीषण होता की बस भररस्त्यात उलटली.आराम बसच्या डावीकडील भागाचा पुरता चुराडा झाला.माहिती मिळताच यवत पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
(हेही वाचा : Pune Air Pollution : पुणेकरांनो जरा जपून! शहरातील वायू प्रदूषणात होतेय झपाट्याने वाढ)
यावेळी नागरीकांच्या मदतीने बसमधील जखमी व्यक्तींना तत्काळ बाहेर काढुन उपचारासाठी पाठवून देण्यात आले. यावेळी पुरुष,महीला,लहान मुले-मुलींसह एकुण तीस जण जखमी झाले.गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी ससुन रुग्णालयात पाठविण्यात आले.दरम्यान,मयत श्वेता पंचाक्षरी या पुणे दिनानाथ मंगेशकर हाॅस्पीटल मध्ये डाॅक्टर असल्याचे समोर आले आहे. अपघाता नंतर ट्रकमधील सिमेंट रस्त्यावर पसरलेले गेले.शिवाय आराम बस रस्त्यात उलटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांना पर्यायी मार्गाने वाहतुक वळवावी लागली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community