पुणे स्टेशन डेपो पूर्णतः इलेक्ट्रिक होणार!

‘पीएमपी’चा पुणे स्टेशन डेपो हा पूर्णतः इलेक्ट्रिक डेपो होत आहे. या डेपोत ९० ई-बस असून, त्यांचे उद्घाटन ऑगस्टच्या अखेरिस होण्याची शक्यता आहे. हा पीएमपीचा पाचवा इलेक्ट्रिक बस डेपो असेल. उद्घाटनाची तारीख निश्चित झाली नसली, तरी पुणे स्टेशन डेपोमध्ये कामांना वेग आला आहे. या नव्या ९० बसमुळे सुमारे ९० हजार प्रवाशांची सोय होणार आहे. केंद्र सरकारच्या ‘फेम-२’ या योजनेतून पीएमपीला १५० बस मिळणार आहेत. यापैकी ४० बस डिसेंबरमध्ये पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या. या एका बसची किंमत १ कोटी ९५ लाख आहे.

( हेही वाचा : राज्यात पावसाचा हाहाकार; वाहतूक ठप्प, अनेक मार्ग बंद!)

प्रवाशांचे वाय-फायद्वारे मोफत मनोरंजन

मागच्या काही दिवसात बस चार्ज करण्यासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा डेपोला मिळत नव्हता. त्यामुळे काही दिवस बसच्या लोकार्पणाचे काम थांबले होते. मात्र, आता ती अडचण दूर झाली आहे. ई-डेपोला पाच हजार ७०० किलो वॉट विजेची गरज होती, ती आता पूर्ण होत आहे.

दरम्यान प्रवाशांना बस प्रवासाकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये लवकरच मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्यात येणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या मासिक पाससह त्रैमासिक ते वार्षिक पासेस देण्यासाठी देखील संचालक मंडळाकडून मान्यता देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here