Pune weather Update : पुण्यात थंडीचा पारा ९.७ अंशावर घसरला; या हंगामातील रेकॉर्डब्रेक थंडी

पुढील दोन दिवस थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

185
Pune weather Update : पुण्यात थंडीचा पारा ९.७ अंशावर घसरला; या हंगामातील रेकॉर्डब्रेक थंडी

जानेवारी महिनाअखेर सुरू झाला, त्यामुळे आता थंडीचा मौसम संपत आला. असा काहीसा विचार पुणेकर करत असतील मात्र मंगळवारी ( २३ जानेवारी) रोजी पुण्यातील पारा ९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील दोन दिवस थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Pune weather Update)

पुणे जिल्ह्यात कडक्याची थंडीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे शहराच्या तापमान सातत्याने घट होत आहे. पुण्यातील अनेक ठिकाणावरील तापमान १० ते १४ अंश सेल्सिअस दरम्यान आले आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही शेकोट्या पेटविल्या जात आहे. थंडीसोबत धुक्याचे प्रमाणही  वाढले आहे. हडपसर,खेड,चिंचवड,आंबेगाव, बालेवाडी येथे अनेक ठिकाणचा पारा घसरला आहे. जानेवारी पासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे पुण्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली होती. (Pune weather Update)

(हेही वाचा : Manoj Jarange-Patil: मनोज जरांगेंच्या पुण्यातील सभेला लाखोंचा जनसमुदाय, पदयात्रा मुंबईच्या दिशेने रवाना)

शहराचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र मागील आठ दिवसांपासून तापमानात हळूहळू घट झाली. सध्याच्या घडीला पुण्यातील तापमान ९ अंशापर्यंत गेले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.