पुण्यातील (Pune) दौंड तालुक्यात भीमा नदीत पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तालुक्यातील हातवळण या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे.
हातवळण परिसरात असलेल्या भीमा नदीत सहा मुलं पोहायला गेली होती, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी तीन जण नदीत बुडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि मच्छिमारांच्या मदतीने शोधमोहीम राबवून त्या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Israel-Palestine War : युद्ध बराच काळ चालणार असल्याने नागरिकांनी तयार रहावे, पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा)
बुडून मृत्यू झालेले तीनही मुलं परराज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. ते हातवळण परिसरात असलेल्या उसाच्या गुऱ्हाळावर कामासाठी आले होते. अमित राय (१८), विशाल दिलेराम (१८) आणि निखिल कुमार (१८), अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. या मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. यावेळी पाटस पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नागरमोजे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community