उन्हाळ्यात अनेकजण गावी जातात, तसेच या कालावधीमध्ये शाळांनाही सुट्ट्या असतात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने उन्हाळ्याच्या हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे ते कानपूर सेंट्रल दरम्यान १८ सुपरफास्ट एक्सप्रेस साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा : MPSC मध्ये ८ हजार पदांची मेगा भरती! )
पुणे ते कानपूर १८ सुपरफास्ट एक्सप्रेस साप्ताहिक विशेष गाड्या
- गाडी क्रमांक 01037 ही सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी १७ एप्रिल ते १२ जून (९ फेऱ्या) पर्यंत पुणे येथून दर रविवारी ६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ७.४५ वाजता कानपूर सेंट्रलला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01038 ही साप्ताहिक विशेष गाडी १८ एप्रिल ते १३ जून (९ फेऱ्या) पर्यंत दर सोमवारी कानपूर सेंट्रल येथून १२.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १७.०० वाजता पोहोचेल.
- थांबे: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन, ओराई
- संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे
आरक्षण सुविधा
या गाड्यांची बुकिंग संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
Join Our WhatsApp Community