PUNE: नववर्ष स्वागतासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल, ‘हे’ रस्ते वाहनांसाठी बंद

लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर पुणेकरांची मोठी गर्दी होते.

260
PUNE: नववर्ष स्वागतासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते वाहनांसाठी बंद
PUNE: नववर्ष स्वागतासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते वाहनांसाठी बंद

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पुण्यातील (pune) वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने रविवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी ५ नंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात बदल केले आहेत. मध्यरात्री गर्दी कमी होईपर्यंत या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे.

वर्ष २०२४चे स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर पुणेकरांची मोठी गर्दी होते. त्यामुळे वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळवण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडू डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक इस्ट स्ट्रीटवरून इंदिरा गांधी चौकाकडे वळवण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाईल. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळवली जाईल. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi : काँग्रेसनंतर आता उबाठाचे ‘वंचित’शी अंतर  )

फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावरील वाहतुकीत बदल…
कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौक येथे बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळवण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी रस्तामार्गे वळवण्यात येणार आहे.

महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता वाहनांसाठी बंद..
लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात रविवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौक दरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.