Pune News: पुण्यात नवरात्रौत्सवानिमित्त वाहतुकीत बदल! ‘हे’ रस्ते राहणार बंद

55
Pune News: पुण्यात नवरात्रौत्सवानिमित्त वाहतुकीत बदल! 'हे' रस्ते राहणार बंद
Pune News: पुण्यात नवरात्रौत्सवानिमित्त वाहतुकीत बदल! 'हे' रस्ते राहणार बंद

नवरात्र (Navratri 2024) उत्सवानिमित्त पुण्यात (Pune News) प्रमुख मंदिरांच्या परिसरात तीन ते १२ ऑक्टोबर दरम्यान वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. नवरात्रोत्सवात भाविकांची श्री चतुःशृंगी मंदिर, श्री भवानीमाता मंदिर, श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात मोठी गर्दी होते. या प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

श्री भवानी माता मंदिर
भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहतूक बदल केले जातील. रामोशी गेट चौक ते जुना मोटार स्टँड दरम्यान रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई असे करण्यात आली आहे. वाहन आहे चालकांनी नेहरू रस्ता आणि परिसरात वाहने लावावीत. श्री भवानी माता मंदिर परिसरातून जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.(Pune News)

श्री चतुः शृंगी मंदिर
सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतुःशृंगी मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. सेनापती बापट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यास पत्रकारनगर चौकातून सेनापती बापट रस्त्याकडे येणारी वाहतूक शिवाजी हाउसिंग सोसायटी चौकातून सेनापती बापट रस्त्याच्या डाव्या बाजूने एकेरी करण्यात येईल. गर्दी वाढल्यास सेनापती बापट रस्त्यावरून श्री चतुःशृंगी मंदिराकडे येणारी वाहतूक वेताळबाबा चौकातून दीप बंगला चौकातून, ओम सुपर मार्केटमार्गे गणेशखिंड रस्त्याकडे वळविण्यात येईल. कॉसमॉस जंक्शनकडून सेनापती बापट रस्त्याकडे येणारी वाहने पॉलिटेक्निक मैदानावर पार्क करावीत, आवाहन वाहतूक पोलिसांनी केले . नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंदिरांच्या परिसरात वरील बदल करण्यात आले. (Pune News)

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर
अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक अशी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. गर्दी वाढल्यास या भागातील वाहतूक व्यवस्थेत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल. लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिर दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, शनिवार पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर, नारायण पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मध्य भागातील मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी नदीपात्रातील रस्ता, मंडईतील वाहनतळावर वाहने लावावीत. (Pune News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.