मेट्रोच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंद ऋषिजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येथील मार्गात पुन्हा नव्याने बदल करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी सोमावारपासून ( ४ मार्च) करण्यात येणार आहे. (Pune)
गेल्या काही महिन्यांपासून येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच विद्यापीठ चौक परिसराची पाहणी केली. त्यानंतर सोमवारपासून (४ मार्च) गणेशखिंड रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल करण्याचा आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिला आहे.
‘या’ ठिकाणी ठराविक काळासाठी रस्ते बंद
विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाणारा रस्ता पोलीस पेट्रोल पंपापर्यंत ‘बफर रोड’करण्यात येणार आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ दरम्यान बाणेर रस्त्याने विद्यापीठ चौकाकडे येणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. दुपारी १२ ते सकाळी ७ पर्यंत विद्यापीठ चौकातून बाणेरकडे वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ दरम्यान विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाणाऱ्या वाहनांनी पाषाण रस्तामार्गे अभिमानश्री सोसायटी चौकातून प्रवास करता येईल.
असे आहेत बदल
– विद्यापीठ चौकातून गणेशखिंड रस्तामार्गे सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजवीकडे वळण्यास मनाई आहे.
– सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कॉसमॉस बँकेसमोरून वळावे. तेथून सेनापती बापट रस्त्याकडे जावे.
– शिवाजीनगरहून गणेशखिंड रस्तामार्गे येणाऱ्या वाहनांना उजवीकडे रेंजहिल्स कॉर्नरकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे.
– वाहनचालकांनी कॉसमॉस बँकेकडून वळून (U turn) रेंजहिल्सकडे जावे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community