Pune Traffic Update: पुणे शहरात मंगळवारपासून होणार वाहतुकीत मोठे बदल, कोणत्या पर्यायी मार्गांचा कराल वापर; जाणून घ्या…

शहर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे तसेच वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत.

230
Pune Traffic: पुण्यात मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल, कोणत्या भागातील रस्ते बंद राहणार?
Pune Traffic: पुण्यात मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल, कोणत्या भागातील रस्ते बंद राहणार?

पुणे शहर परिसरात (Pune Traffic Update) वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर भेडसावत चालली आहे. वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे. नागरिकांची होत असलेला त्रास आणि गैरसोय लक्षात घेता आता पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुणे शहरात मंगळवारपासू (5 मार्च) जड वाहनांना नो एन्ट्री असणार आहे.

पुणे शहरात पिंपरी-चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून बंदी असणार आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

शहर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे तसेच वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत. पुण्यातून बाहेर पडण्यासाठी शहरात जड वाहनांना प्रवेश करता येणार नाही पुणे नगर ,पुणे सोलापूर, पिंपरी चिंचवड पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे.

(हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवारांचा शिरूरमध्ये येऊन खासदार अमोल कोल्हेंविषयी केला धक्कादायक गौप्यस्फोट; म्हणाले…  )

‘या’ मुख्य मार्गांवर जड वाहनांना प्रवेश बंद…
पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. उद्यापासून एकाही जड वाहनाला या मार्गांवर प्रवेश दिला जाणार नाही.

कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर कराल?
– जड वाहनांना वाघोली ते पुणे शहराच्या दिशेनं 24 तास प्रवेश बंद राहणार आहे. या मार्गांऐवजी शिक्रापूरहून चाकण मार्गे पिंपरी चिंचवड आणि तळेगाव दाभाडे मार्गे मुंबईकडे तसेच अहमदनगरकडे जड वाहनांना जाता येईल.
– सोलापूरला जाण्यासाठी थेऊर फाटा येथून पुढे लोणीकंद आणि शिक्रापूर मार्गे पर्यायी मार्ग आहे.
– पुणे सासवड जड वाहनांसाठी हडपसर मार्गे थेऊर फाटा येथून पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. येथून लोणीकंद आणि शिक्रापूर मार्गाने देखील जड वाहनांना प्रवास करता येणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.