पुणे विद्यापीठाने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर केले. निकाल जाहीर करून अडीच महिने झाले, तरीही अद्याप विद्यार्थ्यांना निकालाची प्रत म्हणजेच गुणपत्रिका प्राप्त न झाल्यामुळे विद्यार्थी संघटनेकडून संताप व्यक्त होत आहे.
स्वत: छपाई करण्याचा निर्णय
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने गुणपत्रिकांची छपाई स्वत:च करण्याचा निर्णय घेतला आहे. या छपाईसाठी लागणारी स्टेशनरी, निविदा काढून खरेदी केली जाते. स्वत: छपाई केल्यामुळे विद्यापीठाच्या कोट्यवधी रुपयांची बचत होते. तसेच विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे कायमस्वरूपी विद्यार्थ्यांच्या गुणांचा अहवाल उपलब्ध असतो. कागद खरेदी करण्यात विलंब झाल्यामुळे, अद्यापही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका प्राप्त झालेली नाही.
( हेही वाचा : बापरे! राज्यात ९० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण बाकी )
विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त
स्टेशनरी निविदा काढण्यात विलंब केल्यामुळे, अडीच महिन्यांनंतरही विद्यार्थी गुणपत्रिकेपासून वंचित आहेत. विद्यापीठ इतर विषयात अधिक तत्परता दाखवते. परंतु गुणपत्रिका छपाईसाठी दिरंगाई का, असा सवाल विद्यार्था संघटनांनी केला आहे. गुणपत्रिका उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी समस्या येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर गुणपत्रिका उपलब्ध व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमार्फत करण्यात येत आहे. तर येत्या आठवड्याभरात हे कामकाज पूर्ण होईल, असा विश्वास विद्यापीठाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community