Pune University : सेट-नेट नसतानाही सहाय्यक प्राध्यापक होता येणार

57
Pune University : सेट-नेट नसतानाही सहाय्यक प्राध्यापक होता येणार

महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांमध्ये मोठी लागलेली असते. आता किमान ५५ टक्क्यांसह पदव्युत्तर पदवी मिळविलेले उमेदवारही आता सहायक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी पात्र ठरू शकणार आहेत. (Pune University)

(हेही वाचा – दिल्लीत आप-काँग्रेस आमनेसामने लढणार; Omar Abdullah म्हणाले, इंडी आघाडी बरखास्त करा…)

मानव्यविद्या, वाणिज्य, शिक्षणशास्त्र आदी ठराविक विद्याशाखांसाठीच ही सवलत मिळणार आहे. यामुळे सहायक प्राध्यापकांसाठी आता आणखी स्पर्धा वाढणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्राध्यापक, प्राचार्य आणि अन्य पदे, कुलगुरूपदाची पात्रता, निवड प्रक्रियेच्या नव्या नियमावलीचा मसुदा केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नवी दिल्लीत जाहीर केला. त्यामध्ये या तरतुदी प्रस्तावित आहेत. (Pune University)

(हेही वाचा – Buldhana News : बुलढाणा केस गळती प्रकरणात पाण्याचा अहवाल आला समोर)

या मसुद्यावर हरकती-सूचना नोंदवण्यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षक आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या निवडीसाठीची पात्रता, पदोन्नती यासाठी २०१८ मध्ये नियमावली करण्यात आली होती. आता २०१८ ची नियमावली अधिक्रमित होऊन त्याची जागा २०२५ ची नवी नियमावली घेणार आहे. (Pune University)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.