काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कॅनडातील (Canada) भारतीयांचा एक व्हिडीओ व्हायरल (Pune Viral Video) झाला होता. यामध्ये हजारो भारतीय विद्यार्थी एका रेस्टॉरंटमध्ये वेटरच्या नोकरीसाठी रांगा लावून उभे होते असं दिसत होते. कॅनडासारखचं वाढणाऱ्या बेरोजगारीचं (unemployment) विदारक चित्र आता राज्यातही पाहायला मिळालं आहे. पुण्यात एका आयटी कंपनीच्या मुलाखतीसाठी हजारो विद्यार्थी रांगेत उभे असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओ पुण्यातील मगरपट्टा भागातील असल्याचं म्हटलं जात आहे. (Pune Viral Video)
Pune: Viral Video Shows Over 3,000 Engineers Queuing for Walk-In Interview, Highlighting Fierce IT Job Market Competition pic.twitter.com/9Tvng35aKO
— Pune Pulse (@pulse_pune) January 25, 2025
चांगलल्या पगाराची नोकरी असणाऱ्या आयटी (IT) क्षेत्राचे भीषण वास्तव दाखवणाऱ्या या व्हिडीओमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. इच्छूक उमेदवारांनी मुलाखतीसाठी तब्बल एक किलोमीटर लांब रांगा लावली होती. पुण्यात सुमारे ३,००० इंजिनिअर आयटी कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी रांगेत उभे आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारी लांबलचक रांग, उन्हात उभे असलेले चिंताग्रस्त इंजिनिअर आणि आयटी सेक्टरमध्ये नोकरी मिळण्याची आशा सर्वकाही सांगून जात आहे. (Pune Viral Video)
फक्त २०० जागांसाठी तब्बल ३००० इंजिनिअर तरुण रांगेत
आयटी हब म्हणून ओळख असलेल्या पुण्याच्या एका कंपनीने आयटी कंपनीने थेट मुलाखती ठेवली होत्या. फक्त २०० जागांसाठी कंपनीने मुलाखत ठेवली होती असा दावा सोशल मीडियावर केला जातोय. मात्र त्यासाठी तब्बल ३००० इंजिनिअर तरुण तरुणींनी गर्दी केली होती. (Pune Viral Video)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community