पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर पंपिंग येथे येत्या गुरूवारी म्हणजेच २ जून २०२२ रोजी विद्युत आणि स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीची काही कामे करण्यात येणार आहेत. यामुळे गुरूवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार ३ जून २०२२ रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ फेरी पुन्हा सुरू करा! प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी)
या भागात पाणी पुरवठा राहणार बंद
पर्वती जलकेंद्र भाग – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्वेक्षण क्रमांक ४२ आणि ४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
Join Our WhatsApp Community