पुणे हादरले! माय-लेकाची हत्या, पती बेपत्ता!

पुण्यातील या दुहेरी हत्येचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पुण्याजवळील सासवडमध्ये धक्कादायक घटना घडली असून आई आणि मुलाची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आता त्या महिलेच्या आठ वर्षांच्या मुलाचाही खून झाल्याचे उघड झाले आहे. महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचे नाव अयान शेख आहे. पिकनिकसाठी घराबाहेर पडलेल्या या कुटुंबातील मायलेकाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आलिया यांचे पती आबीद शेखही गायब असल्यामुळे गुंता वाढला आहे.

कात्रज बोगद्याजवळ मृतदेह आढळला!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितनुसार, हे कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहणारे आहे. चार दिवसांपूर्वी आबीद शेख यांनी पिकनिकला जाण्यासाठी ब्रिझा कार भाड्याने घेतली होती. कुटुंब पिकनिकसाठी बाहेर पडले खरे, पण १५ जून रोजी  सकाळी सासवड गावात आलिया यांचा तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असतानाच शहरातील कात्रज बोगद्याजवळ अनोळखी आठ ते दहा वर्षांच्या मुलाचाही मृतदेह आढळून आला. कात्रज पोलिस त्या खुनाचा तपास करत असतानाच काल सकाळी सासवडला ज्यांचा मृतदेह आढळून आला, त्या आलिया यांचा तो अयान नावाचा मुलगा असल्याचे उघड झाले.

(हेही वाचा : माजी आमदार विवेक पाटील यांना अटक! )

दुहेरी हत्येचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान!

दुसरीकडे, आबीद शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रिझा कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटागृहासमोर सोडून दिल्याचे आढळून आलेे आहे. आबीद शेख हे एका कंपनीत ब्रँच मॅनेजर म्हणून काम करतात. पिकनिकसाठी घराबाहेर पडल्यानंतर नेमके काय झाले? आई-मुलाची हत्या का झाली? तसेच आबीद शेख कुठे आहेत? याचा तपास पोलिस करत आहेत. आबीद शेख यांचा ठावठिकाणा लागल्यावरच या प्रकरणावरुन पडदा उठेल. मात्र तूर्तास या दुहेरी हत्येचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here