पुण्याला मिळणार १४ पदरी महामार्गाची भेट; Nitin Gadkari यांची घोषणा

188
पुण्याला मिळणार १४ पदरी महामार्गाची भेट; Nitin Gadkari यांची घोषणा
पुण्याला मिळणार १४ पदरी महामार्गाची भेट; Nitin Gadkari यांची घोषणा

पुणे महामार्गाच्या वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. लवकरच मुंबई पुणे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. (Nitin Gadkari)

काय म्हणाले नितीन गडकरी?

नितीन गडकरी म्हणाले आहेत की, ”अटल सेतू (Atal Setu) जवळून १४ पदरी रस्ता (14-lane highway road) तयार होणार आहे. मुंबईहून बंगळुरूला जाणारा हा रस्ता पुण्यातील रिंग रोड मार्गे तयार केला जाणार आहे. यामुळे मुंबई पुणे मार्गावरची (Mumbai Pune Highway) वाहतूक कोंडी (Traffic Jam) ५० टक्क्याने कमी होणार. पुढील ६ महिन्यात नवीन रस्त्याच्या कामाला होणार सुरुवात आहे.” (Nitin Gadkari)

(हेही वाचा – Pune Ganpati Visarjan: पुण्यात विसर्जनावेळी वाहतुकीमध्ये मोठा बदल! प्रमुख रस्ते पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणता?)

पुण्यातील कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले आहेत की, ”ऑटोमोबाईल क्षेत्रात आपला जगात तीन नंबर आहे. सगळ्यात जास्त जीएसटी भरणारी इंडस्ट्री आहे.” ते म्हणाले, पुढच्या पंचवीस वर्षांत डिझेल गाड्या दिसणार नाहीत. पुढच्या दोन वर्षात जगाचे सेमीकंडक्टर हब बनणार आहे.’ 

‘गडकरींचा पुणेरी टोला’

भारतीयांचे तसं सायन्स, टेक्नोलॉजी, रिसर्च, इनोव्हेशन यात उत्तम काम आहे. तसं लोकसंख्या कशी वाढवायची हे तंत्रज्ञानही फार उत्तम मिळालं आहे. त्यामुळे ऑटो मोबाईल आणि पॉप्युलेशन ग्रोथ कुणी कितीही प्रयत्न करा, थांबतच नाही. पुण्याचे जे चित्र आहे त्याचे खरे कारण कृषी अर्थव्यवस्थेकडे आपण दुर्लक्ष केले त्याचे हे परिणाम आहेत. स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजे असा पुणेरी टोला नितीन गडकरींनी लगावला.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.