पुणेकर सर्वाधिक भ्रष्ट, तर मुंबईकर सर्वात प्रामाणिक

94

पुणेकर यावर्षी देखील लाचखोरीत सगळ्यात पुढे आहेत. मुंबईकर मात्र यावर्षीही लाचखोरीत मागे आहेत. नाशिककर दुसऱ्या तर औरंगाबादकर लाचखोरीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ठाणेकर मुंबईकरांपेक्षा लाचखोरीत एक पाऊल पुढे आहेत. २०२१ मध्ये राज्यातील लाचखोरीची आकडेवारी ७७३ होती, त्यात पुणेकर एक क्रमांकावर होते. यावर्षी वर्षभरात ४ डिसेंबर २०२२ पर्यंत ६८६ गुन्हे राज्यभर नोंदवले गेले आहेत.

1 2

६८६ गुन्ह्यांची नोंद केली

महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते ४ डिसेंबर २०२२ पर्यंत राज्यभरात केलेल्या कारवाईची आकडेवारी जाहीर केली आहे. राज्यात या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६८६ गुन्ह्यांची नोंद केली असून त्यात ९९८ आरोपी आहेत. राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्रात सर्वात अधिक म्हणजे १४६ सापळे लावण्यात आले असून या सापळ्यात २०९ सरकारी कर्मचारी आणि खाजगी व्यक्ती सापडल्या. त्याच बरोबर अपसंपदाचे २ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात ४ आरोपींचा समावेश आहे.

(हेही वाचा ६ डिसेंबर ‘शौर्य दिवस’ म्हणून का होतोय ट्विटर ट्रेंड?)

लाच प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हे दाखल

नाशिक विभागाने ११२ सापळे लावले असून या सापळ्यात १५९ जण मिळून आले. त्यांच्यावर लाच प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच अन्य भ्रष्टाचाराचे ४ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात १४ आरोपींचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद विभाग असून या ठिकाणी लाचखोरीचे १०३ गुन्हे दाखल करण्यात आले, त्यात १२९ आरोपींचा समावेश आहे, अन्य भ्रष्टाचार आणि असंपदाचे ४ गुन्हे दाखल असून त्यात १७ आरोपींचा समावेश आहे.

एकूण ७९ गुन्ह्यांची नोंद झाली

मुंबई आणि ठाणे या दोन शहरात यावर्षी देखील लाचखोरीचे प्रमाण कमी असून मुंबईत केवळ ३९ सापळे लावण्यात आले, या सापळ्यात ५५ जण अडकले गेले  व इतर अन्य ६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ठाण्यात ७७ सापळे, अन्य २ भ्रष्टाचाराचे गुन्हे असे एकूण ७९ गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात ११७ आरोपींचा समावेश आहे. वर्ष २०२१ मध्ये पुणे विभागाने १६५ नाशिक १२९ आणि औरंगाबाद विभागाकडून १३० गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई ४६ तर ठाण्यात ८८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.