-
प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्त चर्चगेट स्थानकाजवळील त्यांच्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुतळ्याची दुरुस्ती तसेच परिसरात त्यांच्या कार्याचा आकर्षक देखावा साकारण्याचे नियोजन आहे. महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आणि वृक्षसंवर्धन यासारख्या त्यांच्या ऐतिहासिक योगदानाला प्रकाश योजना आणि कलात्मक स्वरूपात उजागर केले जाणार आहे.
(हेही वाचा – Elphinstone Flyover Bridge दोन वर्षांसाठी बंद; वाहतुकीसाठी करा ‘या’ मार्गांचा वापर)
मंगळवारी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त जयदीप मोरे, डॉ. असिम गोकर्ण हरवंश आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पाचे काम १५ मे, २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश प्रा. शिंदे यांनी दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांची ३०० वी जयंती ३१ मे, २०२५ रोजी असून, या निमित्ताने हा पुतळा सुशोभित आणि पुष्पमंडित स्वरूपात सादर करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – नौदलाने Rafale खरेदीसाठी ६४ हजार कोटींची डील)
अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांचे सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पुतळ्याच्या पाठीमागील भिंतीवर त्यांच्या कार्याचा इतिहास आकर्षक पद्धतीने मांडला जाईल. या सुशोभीकरणामुळे मुंबईतील नागरिकांना आणि पर्यटकांना त्यांच्या कर्तृत्वाची माहिती होईल, अशी अपेक्षा आहे. प्रा. शिंदे यांनी सांगितले की, हे काम वेळेत आणि दर्जेदारपणे पूर्ण व्हावे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. या प्रकल्पामुळे अहिल्यादेवींच्या (Ahilyadevi Holkar) स्मृतींना उजाळा मिळणार असून, त्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community