नवीन वर्षापासून ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात (Jagannath Puri Temple) येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आला आहे. नवीन वर्ष २०२४च्या पहिल्या दिवसापासून मंदिर परिसरात अशा पद्धतीने हा नियम लागू करण्यात आला आहे.
मंदिर आणि मंदिर परिसरात शॉर्टस, रिप्ड (फाटलेल्या) जीन्स, स्कर्ट आणि स्लिव्हलेस परिधान केलेल्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. याऐवजी पारंपरिक, सुसंस्कृत पोषाख परिधान केलेले भक्त पुरी येथील जगन्नाथ मंदिराला भेट देऊ शकतात. शॉर्ट्स, फाटलेली जीन्स आणि स्कर्ट परिधान केलेल्या भाविकांना मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. एस. जे. टी. ए. गेल्या दोन महिन्यांपासून ड्रेस कोडविषयी जनजागृती करत आहे. त्यांनी भक्तांना सभ्य कपडे परिधान करण्याचे आवाहन केले आहे तसेच मंदिरात आणि मंदिर परिसरात भाविकांना गुटका आणि पान खाण्यासही बंदी आहे. याशिवाय त्यांनी मंदिराच्या आत प्लास्टिकच्या वापरावरही बंदी घातली आहे.
(हेही वाचा- Chitraratha On Rajpath : चित्ररथावरून राजकारण तापले)
रात्री १२.४० वाजता मंदिर उघडल्यानंतर १२.५५ वाजता भाविकांनी मंदिरात प्रवेश करण्यास सुरुवात केली. नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी लाखो भाविक देवाच्या दर्शनासाठी मंदिरात आशीर्वादासाठी येत आहेत.
हेही पहा –