उत्तराखंडमधील वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची चौकशी करणार; मुख्यमंत्री Pushkar Singh Dhami यांचे निर्देश

52
उत्तराखंडमधील वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची चौकशी करणार; मुख्यमंत्री Pushkar Singh Dhami यांचे निर्देश
उत्तराखंडमधील वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची चौकशी करणार; मुख्यमंत्री Pushkar Singh Dhami यांचे निर्देश

उत्तराखंड (Uttarakhand) राज्य सरकार वक्फ मालमत्तांची सखोल चौकशी करणार आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी अल्पसंख्याक विभाग आणि इतर विभागांची एक टीम तयार करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

( हेही वाचा : Tanisha Bhise Death Case : भिसे कुटुंबाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ५ लाखांची मदत नाकारली; दोषींवर कारवाईची मागणी

दरम्यान २००३ मध्ये उत्तराखंड (Uttarakhand) राज्याच्या निर्मितीच्या वेळी, उत्तर प्रदेशातील २०७८ वक्फ बोर्डाच्या मालमत्ता उत्तराखंड वक्फ बोर्डाकडे (Waqf Board) नोंदणीकृत होत्या, परंतु आज त्यांची संख्या ५१८३ पर्यंत वाढली आहे. पण मोठा प्रश्न हा आहे की, वक्फ बोर्डाच्या मालमत्तेत वाढ होण्यामागे जमीन दान देणे कारण आहे की इतर कारण आहे. हे जाणून घेणे गरजेचे आहे. (Pushkar Singh Dhami)

उत्तराखंडमध्ये अशा अनेक वक्फ मालमत्ता आहेत, ज्या सरकारच्या मालकीच्या होत्या. मात्र आता त्या वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्या निर्देशामुळे डेहराडूनसह इतर जिल्ह्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी खटीमा (Khatima) येथे प्रसारमाध्यामांना दिलेल्या माहिती सांगितले की, देवभूमीतील वक्फ मालमत्तांची (Waqf property) चौकशी केली जाईल. ते म्हणाले, राज्याची स्थापना झाली तेव्हा सुमारे दोन हजार वक्फ मालमत्ता होत्या. पण आता ही संख्या इतक्या कशा वाढल्या? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी चौकशी केली जाणार असून सरकारी जमिनीवर कब्जा करून बांधलेल्या अशा वक्फ मालमत्तांचा वापर आम्ही सार्वजनिक हितासाठी करणार, असेही धामी (Pushkar Singh Dhami) म्हणाले. (Pushkar Singh Dhami)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.