गोवर हा श्वसनप्रक्रियेत अडथळा आणणारा आजार आहे. त्यामुळे राज्यात गोवर उद्रेकाचे हाॅटस्पाॅट असलेल्या ठिकाणी पालकांनी मुलांना मास्क घालणे बंधनकारक करायला हवे. त्यामुळे लहान मुलांचे या संसर्गापासून संरक्षण होईल, असे मत राज्याच्या गोवर प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष डाॅक्टर सुभाष साळुंखे यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना व्यक्त केले.
गोवरबाधितांच्या थुंकीतून हा आजार पसरण्याची क्षमता अधिक आहे. थुंकीवाटे कोरोनाची साथ पसरण्याचे प्रमाण एकास दोन असे होते. मात्र, हा आजार 12-14 मुलांना पसरु शकतो त्यामुळे त्याला वेळीच पायंबद घालणे गरजेचे आहे, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. राज्य बाल कोरोना कृती दलाचे सदस्य व बालरोगतज्ज्ञ डाॅक्टर विजय येवेल म्हणाले की, ज्या भागात गोवरचा उद्रेक झाला आहे, त्या भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येतात. त्या ठिकाणच्या मुलांनी मास्क लावला तर नक्कीच फायदा होईल.
( हेही वाचा: मुंबईत पाऊस येणार? बंगालच्या उपसगारात चक्रीवादळाची शक्यता )
Join Our WhatsApp Community