Putin Convoy Car Blast – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या ताफ्यातील लिमोझिन कारचा स्फोट; मॉस्कोमधील एफएसबी मुख्यालयाजवळ घडली घटना

91

Putin Convoy Car Blast राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांच्या ताफ्याच्या लिमोझिन कारमध्ये स्फोट झाला आहे. स्फोटानंतर गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. तसेच मॉस्कोमधील गुप्तचर संस्था एफएसबीच्या (Moscow FSB) मुख्यालयाबाहेर ही घटना घडली. सध्या कारमधील स्फोटाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गाडीला आग लागण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.   (Putin Convoy Car Blast)

मॉस्कोमधील एफएसबी गुप्तचर विभागाच्या मुख्यालयाच्या उत्तरेस व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील एका लिमोझिन कारचा अचानक स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आग प्रथम कारच्या इंजिनमध्ये लागली आणि नंतर ती आतील भागात पसरली. गाडीला आग लागताच, जवळच्या रेस्टॉरंट्स आणि बारमधील कर्मचारी मदतीला धावले. घटनेच्या वेळी गाडी कोण चालवत होते. हे मीडिया अहवालात सांगितले नाही. संबंधित जळालेली ही कार उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (North Korean dictator Kim Jong Un) यांनी भेट दिली आहे.

(हेही वाचा – Shubman Gill ठरला पहिला भारतीय खेळाडू ; आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद १००० धावा)

पुतिन यांच्यावर हल्ल्याची भीती- 
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान (Russia-Ukraine war), क्रेमलिनने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे. अलिकडेच रशियन राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या भाषणाच्या ठिकाणी गटारांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर, मॉस्कोमध्ये पुतिन यांच्या भाषणाच्या ठिकाणाजवळ बॉम्ब शोधण्यासाठी एफएसओ अधिकारी गटारांचे दरवाजे आणि कचऱ्याचे ढिगारे उघडताना दिसले. क्रेमलिनच्या अहवालानंतर राष्ट्रपतींच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची झडती घेण्यात आली. 

(हेही वाचा – IPL 2025, MI vs GT : मुंबई इंडियन्सचा आयपीएलमध्ये सलग दुसरा पराभव, गुजरातने ३६ धावांनी हरवलं)

झेलेन्स्की म्हणाले होते – पुतिनच्या मृत्यूनंतर सर्व काही ठीक होईल
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी २६ मार्च रोजी पॅरिसमध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले होते की पुतिन लवकरच मरतील आणि नंतर सर्व काही (युक्रेन युद्ध) संपेल. ही वस्तुस्थिती आहे. युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले- पुतिन आयुष्यभर सत्तेत राहू इच्छितात. त्याच्या महत्त्वाकांक्षा केवळ युक्रेनपुरत्या मर्यादित नाहीत तर त्यामुळे पाश्चात्य देशांशी थेट संघर्षही होऊ शकतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.