देशाचा पहिला Quantum Computer लवकरच सेवेत; चीननंतर भारताला मोठे यश

65
देशाचा पहिला Quantum Computer लवकरच सेवेत; चीननंतर भारताला मोठे यश
देशाचा पहिला Quantum Computer लवकरच सेवेत; चीननंतर भारताला मोठे यश

सामान्य वापरातील कम्प्युटरच्या तुलनेत कैक पटीने अद्यायवत असलेल्या क्वाण्टम कम्प्युटरच्या (Quantum Computer) निर्मितीत आता भारतानेही प्रवेश केला आहे. देशातील पहिलावहिला सहा क्युबिट्सचा क्वाण्टम कम्प्युटर निर्मितीच्या अंतिम टप्प्यात असून टाटा मूलभूत संशोधन संस्था (Tata Institute of Fundamental Research) म्हणजेच टीआयएफआरचे शास्त्रज्ञ हा कम्प्युटर तयार करत आहेत.

( हेही वाचा : जगभरातील ४० टक्के विद्यार्थी मातृभाषेपासून वंचित; Global Education Monitoring पथकाच्या अहवालाचा निष्कर्ष

गेली १२ वर्ष टीआयएफआरमध्ये हा कम्प्युटर बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे टीआयएफआरमधील (Tata Institute of Fundamental Research) शास्त्रज्ञ प्रा. डॉ. आर. विजयराघवन (Dr. R. Vijayaraghavan) यांनी सांगितले. आता हा सहा क्युबिटचा क्वाण्टम कम्प्युटर अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. क्वाण्टम कम्प्युटिंग, क्वाण्टम कम्युनिकेशन (Quantum communication), क्वाण्टम सेन्सिंग आणि क्वाण्टम मटेरियल्स या चार क्षेत्रांसाठी तब्बल चार हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. (Quantum Computer)

भारतात क्वाण्टम तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या काळात अनेक गोष्टी बदलणार आहेत. मुळे ही सुरुवात आश्वासक आहे, असे डॉ. विजयराघवन (Dr. R. Vijayaraghavan) यांनी सांगितले. आयएफआरतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे (National Science Day) औचित्य साधून विविध शाळा, कॉलेजे आणि सामान्य लोकांना संस्थेत बोलावण्यात आले होते. या वेळी झालेल्या व्याख्यानानंतर त्यांनी ही माहिती दिली. (Quantum Computer)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.