प्रश्नपत्रिका फोडली तर १ कोटींचा दंड, १० वर्षांचा तुरुंगवास; ‘या’ राज्यात होणार कायदा

161
गुजरातमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सरकार कडक कायदे आणण्याच्या तयारीत आहे. येत्या 15 व्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार यासाठी विधेयक आणू शकते. यामध्ये परीक्षेल गैरप्रकार करणाऱ्याला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड, तर प्रश्नपत्रिका फोडणाऱ्याला एक कोटी रुपये दंड आणि दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. विधेयकाची प्रत आमदारांना उपलब्ध करून देऊन त्यावर विचारमंथन सुरू केले आहे.

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार कडक कायदा करणार 

गुजरातमध्ये गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सातत्याने फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. सरकारने या बाबी गांभीर्याने घेत राज्यात कडक कायदे जाहीर केले. आता सरकारने त्या दिशेने पाऊल टाकले आहे. आमदारांना प्रस्तावित विधेयकाची प्रत देऊन त्यावर विचारमंथन सुरू करण्यास सांगितले आहे. गुजरात सार्वजनिक परीक्षा विधेयक 2023 विधानसभेच्या सभागृहात सादर केले जाऊ शकते. याद्वारे परीक्षेतील गैरप्रकारांवर कडक कारवाई केली जाईल. भरती मंडळाच्या जबाबदार व्यक्तीचा सहभाग आढळल्यास 5 ते 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख ते 1 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद केली जाऊ शकते. पुढील अधिवेशनात गृह राज्यमंत्री हर्ष संघवी हे विधेयक सभागृहात मांडणार आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.