तळीये गावाच्या पुनर्वसनाचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी मिळणार पक्की घरे

तळीये गावाचा पुनर्विकास करताना गावात अंगणवाडी, शाळा आणि आरोग्याची सुविधा म्हणून हॉस्पिटलही बांधले जाणार आहे.

122

महाड तालुक्यातील अख्खं तळीये गाव दरड कोसळून एका रात्रीत उद्ध्वस्त झाले. गावातील 32 घरं दरडीखाली गाडली गेली. एका क्षणात हे गाव होत्याचे नव्हते झाले. पण हे गाव आता पुन्हा एकदा वसणार असून, 1 मे रोजी या गावाचे पुनवर्सन होणार असल्याची माहिती शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.

असे देणार घर

नुकतीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री, आमदार, तळीये गावचे सरपंच-उपसरपंच तसेच म्हाडाचे अधिकारी यांची बैठक झाली असून, 1 मे रोजी घरांच्या चाव्या देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. तसेच पाऊस गेला की आम्ही जिथे घरं बांधली जाणार आहेत तिथे सपाटीकरण करणार आहोत. एवढेच नाही तर तीन गुंठे जागेत 600 sq. फुटाचे घर आम्ही देत असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांच्या मागे नैसर्गिक आपत्तींचे ग्रहण!)

काय म्हणाले होते आव्हाड?

कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेले महाड तालुक्यातील तळीये हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. कोणालाही अडचण भासू देणार नाही, असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता. तो पूर्ण करायची ही एक सुरुवात आहे, अशी सूचना मला पवार साहेबांनी दिली होती’, असं ट्वीट करुन जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाने घेतलेल्या जबाबदारीची माहिती दिली होती. तसेच तळीये गावाचा पुनर्विकास करताना गावात अंगणवाडी, शाळा आणि आरोग्याची सुविधा म्हणून हॉस्पिटलही बांधले जाणार आहे.

गुजरातमध्ये बनणार घरं

सध्या तळीये गावाच्या पुनर्विकासातील घरं गुजरातच्या भूज येथील सिटेक कंपनीमध्ये तयार केली जात आहेत. काही दिवसात ही घरं मुंबईत आणली जाणार आहेत. नव्या तंत्रज्ञानाची ही घरे असणार आहेत. ज्या प्रकारे कोकणात वातावरण आहे. त्या सर्व वातावरणात ही घर टिकतील अशा स्वरुपाचे घर बनवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत तळीये गाव वसलेलं असेल, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.

(हेही वाचाः इंग्रजांना हाकललं आता मोदी सरकारलाही हाकलून देऊ! ‘या’ काँग्रेस नेत्याचे मोठे विधान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.