काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सतत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करत असतात. यामुळेच त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात दाखल मानहानीच्या दाव्यात तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
(हेही वाचा – China Kabutar: हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेतले ‘चिनी कबूतर’, ८ महिन्यांपासून पिंजऱ्यात बंदिस्त)
नेमकं प्रकरण काय ?
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या मित्रांनी एका अल्पसंख्याक व्यक्तीला मारहाण केली. त्यामुळे त्यांना आनंद झाला,’ असा उल्लेख सावरकरांनी लिखित स्वरूपात केला असल्याचा दावा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला होता.
त्यांच्या या विधानावर वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी मानहानीचा दावा दाखल केला. त्यावर आता न्यायालयाने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचा – Amit Shah : ईशान्येकडील प्रदेशात शांततेच्या नव्या आणि शाश्वत युगाची सुरुवात – अमित शाह)
Today, Hon. JMFC court ordered the concerned police authority to submit its report by 23/2/2024 under section 202 crpc about the criminal defamation case filed by me against Mr. Rahul Gandhi. @ABPNews @ZeeNews @TimesNow @Republic_Bharat @OpIndia_com @News18India
— Satyaki Savarkar (@SatyakiSavarkar) January 19, 2024
न्यायालयाची भूमिका –
वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केलेल्या मानहानीच्या प्रकरणात ‘फौजदारी प्रक्रिया संहिता २०२ नुसार तपास करून २३ फेब्रुवारीच्या आधी तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी विश्रामबाग पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अॅड. संग्राम कोल्हटकर आणि अॅड. शिवराज जोशी यांनी मांडली बाजू –
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मार्च २०२३ रोजी लंडन येथे केलेले विधान हे आक्षेपार्ह असल्याचे नमूद करत सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. सावरकर यांच्या वतीने अॅड. संग्राम कोल्हटकर आणि अॅड. शिवराज जोशी यांनी बाजू मांडली. या दाव्यात सात्यकी सावरकर यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अभ्यासक चंद्रशेखर साने आणि सावरकरांचे अनुयायी राहुल बनकोंडे यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातील ५०६ राज्यअतिथी उपस्थित राहणार ; जाणून घ्या कोण आहेत निमंत्रणाच्या यादीत)
सखोल तपास करण्याचे आदेश –
या साक्षी ऐकल्यानंतर न्यायालयाने या दाव्याची दखल घेतली आणि पुणे येथील विश्रामबाग पोलिस ठाण्याला फौजदारी प्रक्रिया संहिता २०२ अन्वये सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत, असे सावरकर यांचे वकील अॅड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले. (Rahul Gandhi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community