वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींना सत्ताधारी आमदारांनी मारले जोडे

144

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करीत गुरुवारी सत्ताधारी आमदारांनी त्यांना जोडे मारले. तसेच विधानभवनाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

( हेही वाचा : ठाण्यातील ‘या’ भागात २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद!)

तीव्र शब्दांत निषेध

वीर सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा धिक्कार असो, देश के गद्दारोंको… जुते मारो सालोंको, अशा घोषणा देत शिवसेना-भाजपाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. तसेच राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.

याविषयी बोलताना भाजपाचे आमदार प्रसाद लाड म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांचा असाच समाचार घेतला जाईल. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय, ते कोडगे झाले आहेत. ज्यांनी हिंदुत्व सोडलंय त्यांच्याकडून आम्ही सावरकरांचा सन्मान अपेक्षित करीत नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनाही जनाब उद्धव ठाकरे म्हणावं लागेल, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे, अशी टीकाही लाड यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.