काँग्रेस नेते राहुल गांधी हे सवंग लोकप्रसिद्धीसाठी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करतात. सध्या छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचे 85वे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा रविवार, २६ फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस होता, त्या वेळीही राहुल गांधी यांनी पुन्हा वीर सावरकर यांच्यावर बिनबुडाची टीका केली. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सवंग लोकप्रसिद्धीसाठीचा लाजिरवाणा प्रयत्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी म्हणाले, सावरकरांची विचारधारा म्हणजे तुमच्यापेक्षा बलवान असलेल्या समोर मान खाली घाला, भारताचे मंत्री चीनला सांगत आहेत की, तुमची अर्थव्यवस्था आमच्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यासमोर उभे राहू शकत नाही. देशभक्ती कशाला म्हणतात? कोणती देशभक्ती? ही देशभक्ती आहे का?
(हेही वाचा भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भव्य थीमपार्क आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय उभारणार! पर्यटनमंत्र्यांची घोषणा)
याआधीही राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर टीका केली होती. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर पुन्हा टीका केली होती. वीर सावरकर यांनी त्यांच्या सुटकेसाठी ब्रिटिशांना माफीनामा लिहून दिला होता, असे राहुल गांधी म्हणाले होते.
Join Our WhatsApp Community