राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेच्या सभागृहात भाषण करताना हिंदू हिंसा करतात, द्वेष पसरवतात व सतत खोटे बोलतात, असे म्हटले होते. त्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने संपूर्ण कोकण प्रांतातील (पालघर ते गोवा) 33 जिल्ह्यात जोरदार निदर्शने केली. पालघर, वसई, भाईंदर, बोरिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी सांताक्रुज, दादर, परेल, सायन, चेंबूर घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, ठाणे कळवा, भिवंडी, कुलाबा, पेण, पनवेल, रायगड, रत्नागिरी, गोवा आदी ठिकाणी आयोजित निदर्शनात मोठ्या संख्येने हिंदू समाज रस्त्यावर उतरला होता.
नवी मुंबईतील हिंदूंनी राहुल गांधी यांची बुद्धी ठिकाणावर येण्यासाठी स्थानिक ग्रामदेवतेला गार्हाणे घातले. धारावीत विभाग मंत्री राजीव चौबे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. वरील सर्व ठिकाणी हिंदू युवक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि राहुल गांधींच्या नावाने निषेधाचा शिमगा केला. अनेक भागात राहुल गांधींच्या फोटोवर काळी शाई फेकण्यात आली, तर काही ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
(हेही वाचा – वनांचे, पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या गावकऱ्यांच्या सरकार पाठीशी; Sudhir Mungantiwar यांची विधासभेत ग्वाही)
योगायोग की तुकडे तुकडे टोळीचे पूर्वनियोजित षडयंत्र ? – मोहन सालेकर
सांताक्रुज स्टेशन समोर झालेल्या निषेध आंदोलनात विहींपचे प्रदेश मंत्री मोहन सालेकर यांनी राहुल गांधी यांचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी बोलताना सालेकर म्हणाले, “राहुल गांधी संसदेत भगवान शंकरांचा फोटो दाखवून हिंदूंचा अपमान करतात, दुसरीकडे उत्तर प्रदेशात कैलास नावाची क्रिप्टो ख्रिश्चन व्यक्ती भोळ्या भाबड्या हिंदूंचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करते आणि तिसरीकडे हातरसमध्ये भोले बाबा असे नाव घेणाऱ्या व्यक्तीच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक बळी जातात. याला काय म्हणावे ? योगायोग की तुकडे तुकडे टोळीचे पूर्वनियोजित षडयंत्र!
अलीकडच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशातील तथाकथित सेक्युलर टोळी सक्रिय झाली आहे. दिल्लीत संसदेत हिंदूंना हिंसक म्हणणारे आणि हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा कमजोर करून आपल्या संस्कृती पासून दूर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोले बाबाला संरक्षण देणारे हेच ते “यूपी के दो लडके” आहेत. या तुकडे तुकडे टोळीचे प्रयत्न हा एक पूर्वनियोजित षडयंत्राचा भाग आहे, असा घणाघात सालेकर यांनी या वेळी बोलताना केला.
देशात भीतीचे व अस्थिरतेचे वातावरण तयार करून, हिंदू समाजात फूट पाडून आगामी विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्यांकांच्या मतांची बेगमी करण्याचा डाव हिंदू समाजाने ओळखायला हवा. आपल्या अस्मितेच्या आणि अस्तित्वाच्या प्रश्नावर सकल हिंदू समाजाने संघटित विचार करावा असे कळकळीचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या निषेध सभांना बजरंग दलाचे संयोजक रणजीत जाधव सहसंयोजक गौतम रावरीया, प्रांत सहमंत्री राजेंद्र पवार मुंबई क्षेत्र मंत्री रामचंद्र रामुका आदी मान्यवरांची संबोधित केले. (Rahul Gandhi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community