मराठा आरक्षणासाठी संसदेत आवाज उठवलेला आवाज, मराठा आंदोलनाच्या वेळी घेतलेली भूमिका यांसह अनेकदा ठाम भूमिका घेतलेल्या खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी मराठा समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे, अशा शब्दांत छत्रपती संभाजी राजे यांनी खासदार शेवाळे यांच्या कार्याचा गौरव केला. शेवाळे यांच्या स्थानिक खासदार निधीतून गोवंडी येथे बांधण्यात आलेल्या मराठा भवनाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. रविवारी दुपारी पार पडलेल्या या सोहळ्याला छत्रपती संभाजी राजे, खासदार राहुल शेवाळे यांसह आमदार प्रसाद लाड, माजी आमदार तुकाराम काते, युवराज संभाजी राजे छत्रपती शिवसेना उपनेते लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) साहेब आमदार प्रसाद लाड माजी आमदार तुकाराम काते मराठा समाजाचे नेते संभाजी राजे दहातोंडे, राजेंद्र कोंढरे बंसीदादा डोके, महिला संपर्क प्रमुख कामिनी राहुल शेवाळे, शिवसेना विभागप्रमुख अविनाश राणे, सुनीता वैती आणि मोठ्या संख्येने मराठा समाजतील बंधू – भगिनी उपस्थित होते.
गोवंडी येथील मराठा भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात सामील होण्याआधी छत्रपती संभाजी राजे, खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांसह अन्य मान्यवरांनी पांजरापोळ येथील छत्रपती स्मारक येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर भव्य बाईक रॅलीतून सर्व मान्यवर कार्यक्रमस्थळी पोहोचले. छत्रपती संभाजी राजेंच्या शुभहस्ते मराठा भवनाचे लोकार्पण करण्यात आले.
(हेही वाचा – Devendra Fadnavis : “मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही”)
मराठा समाजने मला नेहमीच सहकार्य असून समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. बोराबादेवी चौकात उभारण्यात आलेले 500 चौरस फुटांचे मराठा भवन हे समाजाच्या विकासाचे भविष्यातील महत्त्वाचे केंद्र ठरणार असून इथे सारथी केंद्र, अण्णासाहेब पाटील महामंडळ यांसह विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा मानस आहे. तसेच मराठा समाजातील तरुणांच्या कौशल्य विकासाचे केंद्र देखील इथे चालवले जाणार आहे.
– खासदार राहुल शेवाळे
छत्रपती संभाजी राजे यांची कौतुकाची थाप
खासदार राहुल शेवाळे हे संसदेतील माझे सहकारी आणि चांगले मित्र असून त्यांनी मराठा समाजासाठी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. खासदार शेवाळे यांनी मराठा आरक्षणासाठी संसदेत नेहमीच आग्रही भूमिका घेतली. माझ्या आमरण उपोषणाच्या काळातही त्यांनी केलेले सहकार्य मोलाचे आहे. आता त्यांनी उभे केलेले हे समाज भवन म्हणजे समाजाच्या विकासासाठी त्यांनी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community