Raigad fishing boat fire : अलिबाग समुद्रात मच्छीमार बोटीला लागली आग ; बोटीत 18 ते 20 खलाशी

69
Raigad fishing boat fire : अलिबाग समुद्रात मच्छीमार बोटीला लागली आग ; बोटीत 18 ते 20 खलाशी
Raigad fishing boat fire : अलिबाग समुद्रात मच्छीमार बोटीला लागली आग ; बोटीत 18 ते 20 खलाशी

अलिबाग (Alibaug) जवळ समुद्रात मच्छीमार बोटीला आग (Raigad fishing boat fire) लागल्याची घटना घडली आहे. भर समुद्रात बोटीने पेट घेतला आहे. या आगीत बोट 80 टक्के जळून खाक झाली आहे. बोटीवरील जाळी देखील जळाली आहे. बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती आहे. बोटीवरील सर्व खलाशी सुखरुप आहेत. (Raigad fishing boat fire)

हेही वाचा-Maharashtra CMO : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची पाकिस्तानी नंबरवरून धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, साखर आक्षी गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटमुळं (short circuit) ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिकांच्या मदतीनं ही बोट किनाऱ्यावर आणली आहे. सध्या आग विझविण्याचं काम सुरु आहे. (Raigad fishing boat fire)

हेही वाचा-Earthquake : 3 तासांत भारतासह नेपाळ, पाकिस्तान, तिबेटची जमीन भूकंपाने हादरली

साखर आक्षी येथील राकेश गण यांच्या मच्छीमारी बोटीला समुद्रामध्ये सहा ते सात नोटिकल मैल अंतरावर पहाटे तीन ते चार वाजेचे दरम्यान इलेक्ट्रिक शॉक सर्किट होऊन आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्या ठिकाणी मदतीला कोस्ट गार्ड व नेवीच्या बोटी मदतीला पोहोचलेल्या असून सर्व खलाशी सुरक्षित आहेत. दरम्यान, समुद्रात अचानक बोटीने पेट घेतल्यामुळं खलाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पण आगीची माहिती मिळताच स्थानिकांच्या साथीनं बोट समुद्रकिनारी नेण्यात आली आहे. (Raigad fishing boat fire)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.