मागील काही दिवसांपासून कोकणाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील (Raigad District) महाडमध्ये (Mahad) पूरस्थिती निर्माण झाली होती. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत १५५९.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील चार दिवस झालेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. दरम्यान, पावसात झाड पडून एकाचा, तर पाण्यात वाहून दोघांचा मृत्यू झाला आहे. यावेळी ८ जनावरेही दगावल्याचेही नियंत्रण कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Raigad Monsoon Update)
जिल्ह्यात पावसाने २०० हून अधिक घरांचे अंशतः, पूर्णतः नुकसान झाले असून, ३७५ कुटुंबांतील १००७ जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यात आपत्तीच्या अनुषंगाने ३४ जणांचे एनडीआरएफ (NDRF) पथक तैनात ठेवण्यात आलेले आहे. (Raigad Monsoon Update)
(हेही वाचा – युद्धनौका INS Brahmaputra चा अपघात; 1 अधिकारी बेपत्ता)
दक्षिण रायगडला सर्वाधिक फटका
दरम्यान, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा (Raigad Heavy Rain) इशारा देण्यात आला होता. त्यानुसार दक्षिण भागात पावसाचा जोर अधिक होता. महाड येथील सावित्री नदीने (Savitri River) धोक्याची पातळी ओलांडली होती. तर रोहा, कुंडलिका नद्याही ओसंडून वाहत होत्या.
पावसात पेण-सापोली आदिवासी वाडीवरील यश चंद्रकांत नाईक यांच्या अंगावर झाड पडून मृत्यू झाला. महाड तालुक्यातील नामदेव सीताराम अंबावले हे दादली नदीत पडून, तर बाळाजी उतेकर वाळण खुर्द ओढ्यात पडल्याने दगावले. पावसामुळे ६ मोठ्या, तर दोन लहान जनावरांचा मृत्यू झाला. (Raigad Monsoon Update)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community