उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा मोठा घातपात टळला आहे. लोको पायलटने दाखवलेल्या प्रसंगावाधानामुळे सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना टळली. उदयपूर- जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा घातपात (Railway Accident) घडवण्याच्या उद्देशाने ट्रॅकवर दगड-धोंडे ठेवले होते. अख्खी ट्रेन ट्रॅकवरुन उलटवण्याचा कट होता. मात्र लोकोपायलटच्या चाणाक्षपणामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर आता पिंपरी चिंचवड शहरातून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. चिंचवड ते आकुर्डी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर अज्ञात समाजकंटकांनी रुळांवर मोठं मोठे दगड रचून ठेवून रेल्वे गाडीला अपघात करण्याचा डाव रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधनाने सुदैवाने उधळला आहे.
पुणे विभागातील रेल्वे प्रशासनाने काही समाजकंटकांनी रेल्वे रुळांवर लावलेले मोठे खड्डे वेळीच हटवल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. चिंचवड-आकुर्डी विभागात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास दगड सापडले. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोठे दगड अप लाईन ट्रॅकवर टाकण्यात आले होते. रेल्वे विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे रेल्वे कर्मचारी या विभागात रुटीन ट्रॅक मेंटेनन्स वेल्ड टेस्टिंग कामासाठी गेले असताना, कर्मचाऱ्यांनी चिंचवड ते आकुर्डी दरम्यान UP लाईन ट्रॅकवर मोठे दगड ठेवले आढळून आले. कर्मचार्यांनी या गैरप्रकाराचा वेळीच शोध घेतल्याने मोठा अनैसर्गिक प्रकार घडण्याची शक्यता टळली आहे. रेल्वे ट्रॅक वर आरपीएफ आणि जीआरपीकडून पुढील तपास सुरू आहे, रेल्वे अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
(हेही वाचा Nanded hospital deaths : डाॅक्टरांची भरती आणि औषध पुरवठ्याचा मुंबई उच्च न्यायालयाने मागितला लेखाजोखा)
Join Our WhatsApp Community