Railway Accident : ठाणे स्थानक हे गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. याच स्थानकातून रोज मुंबईकडे आणि ठाण्यापुढे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ८ लाखांच्या आसपास आहे. सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या आणि रात्री ठाण्यातून कल्याणकडे जाणाऱ्या रेल्वे लोकलमधील प्रवास हा घुसमटीचा आणि धोक्याचा झाल्याचे चित्र आहे. वाढती लोकसंख्या आणि प्रमुख जलद दळणवळण असलेली रेल्वे (Railway) सेवेवर लोकसंख्येचा मोठा भर पडत आहे. त्यामुळे अपघातांची संख्याही वाढत आहे. त्यातच कळवा-मुंब्रा रेल्वे प्रवास (Kalwa-Mumbra Train Travel) हा धोक्याचा झाला असून, लोकलमधून पडून २ वर्षांत ३१ जणांना जीव गमवावे लागला आहे. तर रेल्वे रूळ ओलांडताना सन २०२४ या वर्षात १५१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद ठाणे रेल्वे पोलिसांनी केली आहे. ठाणे रेल्वे पोलीस (Thane Railway Police) ठाण्यात विविध प्रकारच्या अपघाती निधनाची नोंद करण्यात आलेली आहे. (Railway Accident)
मध्य रेल्वेच्या (Central Railway) हद्दीत अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, यात महिला प्रवाशांचाही समावेश असल्याची माहिती उपलब्ध आहे. मध्य रेल्वेच्या प्रवासात जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या अपघातांत १९२ प्रवासी जखमी झाले आहेत, तर यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेच्या प्रवासात जखमी महिलांची संख्या ५० तर रेल्वे प्रवासात विविध प्रकारच्या चुकांमुळे जखमी झाल्याची संख्या १६० एवढी आहे. यामध्ये १४२ पुरुषांचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या विविध भागांत फेब्रुवारी, २०२५ या वर्षात घडलेल्या अपघातांची संख्या १५८ एवढी आहे. जानेवारीपेक्षा फेब्रुवारीमध्ये अपघातांची संख्या वाढलेली आहे.
(हेही वाचा – अक्षय शिंदे प्रकरणाची पुनरावृत्ती होणार ? Devendra Fadnavis उत्तर देताना म्हणाले …)
फेब्रुवारी महिन्याच्या २५ दिवसांमध्ये १५८ लहान-मोठे अपघातात होऊन ११२ पुरुष जखमी झालेले आहेत, तर ४६ महिलाही जखमी झाल्या आहेत. या अपघातात जखमी झालेल्या अनोळखी प्रवाशांची संख्या ६५ एवढी आहे. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकात रेल्वे ओलांडताना झालेल्या अपघाताचा आकडा हा २०२३ मध्ये अपघाती मृत्यूचा एकदा १७९ होता. तर मागील वर्षी २०२४ मध्ये अपघाती मृत्यूचा आकडा १५१ होता. या दोन वर्षांत रेल्वेतून पडून ३१ प्रवाशांचा मृत्यू कळवा-मुंब्रादरम्यान झाल्याची माहिती मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) चे उपाध्यक्ष आनंद पाटील यांनी दिली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community