प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार दरम्यान विशेष शुल्कासह २ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे
- 08101 समर स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १८.६.२०२२ रोजी २२.०० वाजता सुटेल आणि तिस-या दिवशी ११.३५ वाजता शालिमार येथे पोहोचेल.
- 08102 समर स्पेशल शालिमार येथून दि. १४.६.२०२२ रोजी १५.३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
- संरचना : दोन द्वितीय वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि २ द्वितीय आसन श्रेणीसह ब्रेक व्हॅन.
थांबे : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, वरणगाव (फक्त 08101 साठी), बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मुर्तीजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनी, नागपूर.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप्स डाउनलोड करा.
( हेही वाचा: साई रिसाॅर्टप्रकरणी समन्स; अनिल परब ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत )
आरक्षण : विशेष ट्रेन क्र. 08101 साठी बुकिंग विशेष शुल्कासह दि. १५.६.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community